Homeलातूरचाकूर येथील साईनंदनवनममध्ये सत्यसाईबाबांचा उद्या प्रेमवाहिनी रथ

चाकूर येथील साईनंदनवनममध्ये सत्यसाईबाबांचा उद्या प्रेमवाहिनी रथ

चाकूर : प्रतिनिधी
येथील सुप्रसिध्द साईनंदनवनममध्ये रविवारी दि १७ मे रोजी भगवान सत्यसाईबाबा यांचा प्रेंमवाहिनी रथ सकाळी भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती श्रीकृष्ण सत्यसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष उत्तमराव जाधव आणि आणि उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली आहे.
जाधव पुढे म्हणाले की, सन २००१ मध्ये भगवान सत्यसाईबाबा यांच्या हस्ते साईनंदनवनम परिसरात शिवालय मंदिरातील महादेव पिंड, तसेच श्रीकृष्ण मूर्तीची आणि मंदीर परिसरातील इतर देवदेवतांच्या मंदीरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख, देशाचे तत्कालीन गृहमंत्री कै.शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण या मान्यवरांसह विविध क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. याच पावन भूमीत रविवारी दि १७ मे रोजी सकाळी ७  ते १० वाजेपर्यत साईभक्ताना भगवान सत्यसाईबाबा यांचा प्रेंमवाहिनी रथ दर्शनासाठी खुला असणार आहे. भगवान सत्यसाईबाबा यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर विविध धार्मिक,आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिद्ध पुटपुर्ती येथे आयोजित केले गेले होते.
भगवान सत्यसाईबाबा यांचे सर्वधर्मसमभावाचे विचार लोकापर्यत पोहोचण्यासाठी प्रेंमवाहीनी ही रथयात्रा महाराष्ट्रात विविध ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी जात आहे. लातूर जिल्ह्यात ही प्रेंमवाहीनी रथयात्रा शनिवारी दिं १६ मे रोजी येणार असून सकाळी सलगरा या गावी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांना उपलब्ध असणार आहे. त्यानंतर लातुरात शैलेश शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी सांयकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यत भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. रविवार दि १७ मे रोजी सकाळी ही प्रेंमवाहीनी रथयात्रा सकाळी ७ वाजता शिवालयात भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR