मॉर्निंग वॉकदरम्यान चिमुरडीवर बिबट्याची झडप

पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. ओतूर परिसरातील वाकचौरे मळा येथे गुरुवारी पहाटे १० वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. काव्या महेंद्र वाकचौरे असे जखमी मुलीचे नाव असून या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान काव्या आपल्या बहिणीसोबत घराजवळ मॉर्निंग वॉक करत होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. बिबट्याने हल्ला करताच काव्याने मोठ्याने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा गोंधळ आणि ओरड सुरू झाल्यानंतर बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. ओतूर येथे १४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू झाले नसल्याने जखमी मुलीच्या उपचारासाठी मोठी गैरसोय झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचा-यांची नियुक्ती नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अशोक सखाराम अहिनवे आणि मुलीच्या पालकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56

Latest news