36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरघटक पक्षातील नेत्यांनी विरोध करू नये -प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव

घटक पक्षातील नेत्यांनी विरोध करू नये -प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव

सोलापूर : बारामती मतदारसंघ हा आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, घटक पक्षातील नेत्यांनी विरोध करू नये अन्यथा आम्ही महायुतीतील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काम करणार नाही घटक पक्षातील नेत्यांनी बारामती येथील अजित पवार राष्ट्रवादी गटातील लोकसभेतील उमेदवाराला विरोध करू नये अशी आमची भूमिका आहे बारामती मतदारसंघ हा आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित दादांच्या विरोधात दंड थोपाटून बारामती मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी घोषणा करणारे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महायुतीतीलच अजित पवार गटाच्या बारामती लोकसभा उमेदवाराला विरोध दर्शविला आहे हे बाब अत्यंत गंभीर आहे .

कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले होते मोठ्या ताकतीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा अशा आदेश देखील त्यांनी दिला होता परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या उमेदवाराला खुद्द राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि महायुतीतीलच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विरोध दर्शविला आहे .

हा विरोध आम्ही सोलापूरकर राष्ट्रवादी पार्टी सहन करणार नाही जोपर्यंत बारामती येथील लोकसभा उमेदवाराला सहभागी घटकातील पक्षांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीतील उमेदवारांना स्पष्ट पाठिंबा देणार नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी आपली भूमिका मांडली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला विरोध करू नये अन्यथा सामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही जोपर्यंत बारामती येथे महायुतीतील सहभागी घटकांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत सोलापुरातील आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार नसल्याचे स्पष्ट भूमिका देखील आमची असल्याचे किसन जाधव म्हणाले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR