38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनदुबईमध्ये अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण

दुबईमध्ये अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण

मुंबई : साऊथचा सुपरस्टार आणि पुष्पा भाऊ म्हणून ओळखला जाणारा अल्लू अर्जुनने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट क्षेत्रात एक वेगळी छाप पाडली आहे. अल्लू अर्जुनने नुकतेच जगप्रसिध्द मादाम तुसाद (दुबई) येथे आपल्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. गुरुवारी संध्याकाळी अल्लू अर्जुनच्या पुतळ्याचे अनावरण झाले. हा आनंदाचा क्षण अल्लूने आपल्या चाहत्यांशी शेअर केला आहे. त्याने त्याच्या मेणाच्या पुतळ्यासह स्वत:चे काही फोटो आपल्या सोशल मीडिया साईटवरून शेअर केले आहेत, त्याला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करून अल्लूचे अभिनंदन करत आहेत.

अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा – २ द रुल’साठी चर्चेत आहे. त्याचवेळी त्याला ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी जागतिक ओळख मिळाली. पुष्पा भाऊला मेणाच्या पुतळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपल्या पुतळ्यासह पुष्पाची प्रतिकात्मक पोज (झुकेगा नही साला) पुन्हा दिली आणि पुष्पा शैलीत छायाचित्रे काढली. यावेळी अल्लू अर्जुनने मेणाच्या पुतळ्याला ज्या प्रकारचे लाल जॅकेट घातले आहे तसेच लाल जॅकेट परिधान केले आहे.

अल्लू अर्जुनला मादाम तुसादमध्ये स्थान मिळाल्यामुळे चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेता राम चरणची पत्नी उपासना लक्ष्मी मंचू चिरंजीवीची मुलगी सृजाचा यांनी अल्लूचे कौतुक करून त्याचे अभिनंदन केले आहे. अल्लू अर्जुनचा पहिला चित्रपट गंगोत्री २८ मार्च २००३ रोजी प्रदर्शित झाला होता, त्याच दिवशी या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR