36.3 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनसध्या बॉलिवूडमध्ये नायकच करतात खलनायकाच्या भूमिका : प्रेम चोप्रांचा दावा

सध्या बॉलिवूडमध्ये नायकच करतात खलनायकाच्या भूमिका : प्रेम चोप्रांचा दावा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा हे बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक खतरनाक भूमिका साकारल्या आहेत. ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ ‘बॉबी’ चित्रपटातील हा संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अभिनेते प्रेम चोप्रा हिंदी चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिकेबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसले.

प्रेम चोप्रा यांनी मोठ्या पडद्यावर खलनायकाच्या जेवढ्या भूमिका केल्या त्या अविस्मरणीय आहेत.चित्रपटात प्रेम चोप्रा यांचा सीन आला की, आता काहीतरी गडबड होणार असे प्रेक्षकांना वाटायचे. या विषयावर बोलताना प्रेम चोप्रा सांगतात की, बॉलिवूडमध्ये पूर्वी हिरो फक्त नायकाच्याच भूमिका करत असत आणि खलनायक फक्त नकारात्मक भूमिकेतच दिसायचे.

आता काळ बदलला आहे, आजकाल हिरोच खलनायकाच्या भूमिका करताना दिसतात. आजच्या खलनायकांची एक बॅकस्टोरी आहे. यासाठी त्यांनी नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे उदाहरण दिले. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरचे पात्र नकारात्मक आहे. कारण त्याच्या वडिलांवर हल्ला होतो, यामुळे तो नकारात्मक भूमिकेकडे वळतो. आमच्या काळी खलनायकाच्या पात्रांना बॅकस्टोरी नसायची त्यामुळे प्रेक्षक आमचा तिरस्कार करायचे आणि आजचे खलनायक प्रेक्षकांना चांगले वाटतात, असे चोप्रा म्हणाले.

शाहरूखसह अनेक अभिनेते बनले खलनायक

बॉलिवूडमध्ये आज असे कलाकार आहेत ज्यांनी नायकाच्या भूमिका करून नंतर खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. यामध्ये शाहरूख खानचे नाव सर्वांत अगोदर घ्यावे लागेल. कारण शाहरूखला ‘डर’मधल्या नकारात्मक भूमिकेमुळे ओळख मिळाली आणि त्याने बॉलिवूडमध्ये नायक देखील नकारात्मक काम करून स्वत:ची ओळख निर्माण करू शकतो हे दाखवून दिले. शाहरूखसह अनेक नायकांनी खलनायकांच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये हृतिक रोशन, आमिर खान, संजय दत्त, अजय देवगण, रितेश देशमुख, जॉन अब्राहम आदी अभिनेत्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR