गुवाहाटी : चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या १९ व्या मोसमातील आपल्या पहिल्याच आणि स्पर्धेतील एकूण तिस-या सामन्यात ढेर झाली आहे. सीएसकेला राजस्थान विरुद्ध पूर्ण २० ओव्हरही खेळता आले नाही. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर सीएसकेच्या फक्त तिघांनाचा दुहेरी आकडा गाठता आला. त्यातही जेमी ओव्हरटन या एकट्या फलंदाजाने २० पार मजल मारली.
त्यामुळे सीएसकेला राजस्थानसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आले. राजस्थानने सीएसकेला २ बॉलआधी ऑलआऊट केले. जेमी ओव्हरटन याच्या खेळीच्या जोरावर सीएसकेला १९.४ ओव्हरमध्ये १२७ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आता राजस्थानचे फलंदाज घरच्या मैदानात १२८ धावांचे आव्हान किती षटकांत पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

