35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवआ. कैलास पाटील यांना भरसभेत उष्माघाताने भोवळ

आ. कैलास पाटील यांना भरसभेत उष्माघाताने भोवळ

खासगी रूग्णालयात उपचार सुरू

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव-कळंब मतदारसंघाचे शिवसेनेचे (ठाकरे) आमदार कैलास घाडगे-पाटील यांना मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी सभा सुरू असताना उष्माघाताचा (हिटस्ट्रोक) त्रास झाला. त्यांना चक्कर येऊन भोवळ आल्याने ते खाली कोसळले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना धाराशिव शहरातील निरामय या खासगी रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

मंगळवारी दि. १६ रोजी धाराशिव जिल्ह्यात उन्हाचा पारा ४२ अंशावर होता. कडक उन्हाच्या तडाख्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी धाराशिव शहरातून मोठी रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नगर परिषदेच्या प्रांगणात महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख, युवासेना नेते आ. आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) युवानेते रोहित पवार, लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी आ. राहुल मोटे, शिवसेना संपर्क प्रमुख शंकरराव बोरकर, जीवनराव गोरे आदी नेतेमंडळी उपस्थित होते.

दरम्यान, आ. कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना चक्कर येऊन भोवळ आली व खाली कोसळले. त्यांना कार्यकर्त्यांनी तातडीने निरामय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपस्थित डॉक्टरांनी उपचार केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही. जागरण व उष्णतेमुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना सध्या काही दिवस आरामाची गरज असल्याचे सांगितले. हा उष्माघाताचा प्रकार असून काळजी घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालयात गर्दी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR