28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी १३ एप्रिल रोजी आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसने मनीष तिवारी यांना चंदीगडमधून उमेदवारी दिली आहे. तर विक्रमादित्य सिंह यांना हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत यांच्या विरोधात तिकीट दिले आहे. दरम्यान, विनोद सुलतानपुरी यांना शिमल्यातून आणि परेश धनानी यांना राजकोटमधून तिकीट मिळाले आहे.

अभिनेत्री कंगना रणौत यांच्या समोर हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांना मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर विनोद सुलतानपुरी यांना शिमल्यातून आणि परेश धनानी यांना राजकोटमधून तिकीट मिळाले आहे. काँग्रेसच्या या यादीत चार राज्यांतील १६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR