28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमास्को हल्ल्यातील मृतांचा आकडा ८० वर, १५० हून अधिक जखमी

मास्को हल्ल्यातील मृतांचा आकडा ८० वर, १५० हून अधिक जखमी

मास्को : वृत्तसंस्था
मास्कोमधील क्रॉकस सिटी हॉलमध्ये संगीत कार्यक्रम सुरू असताना लष्करी जवानांसारखे कपडे घालून आत शिरलेल्या तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार व बॉम्बफेक केली. त्यात किमान८० जण ठार झाले, तर १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी स्फोटके फेकल्याने हॉलला मोठी आग लागली होती. रशियन सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे.

माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२२) संध्याकाळी, अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मास्को प्रांतातील क्रॅस्रोगोसार्कमधील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार सुरू केला. या दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात ८० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाच अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला होता. हल्ल्यानंतर घटनास्थळाजवळ पोलिस आणि इतर यंत्रणा उपस्थित आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनही लक्ष ठेवून आहेत. याशिवाय रशियन लष्कराचे विशेष दलही क्रोकस सिटी हॉलमध्ये पोहोचले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बंदूकधारी व्यक्ती हॉलमध्ये घुसले. तीन हजारांहून अधिक प्रेक्षक कार्यक्रमाचा आनंद घेत असताना त्या तिघांनी अचानक अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. तसेच भेदरलेल्या प्रेक्षकांवर बॉम्बही फेकले. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. हल्ल्यामुळे, रशियामध्ये आठवड्याच्या शेवटी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये होळीच्या कार्यक्रमांचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR