38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीवनामकृवि अंतर्गत रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ

वनामकृवि अंतर्गत रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत असलेल्या रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली होती. याचा त्रास विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी यांना होत होता. शासनाने विद्यापीठातील २६ किलोमीटर लांबीच्या रस्ता डांबरीकरणास मंजुरी दिली असून १४.७५ कोटी रूपयांचा निधी विद्यापीठास देण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. विद्यापीठातील रस्ते चांगले होत असल्याने नागरीकांतही समाधान व्यक्त होत आहे.

विद्यापीठातील रस्ते चांगले व्हावेत यासाठी शहरातील व बाहेरील अनेक नागरिकांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्याकडे इच्छा व्यक्त करत होते. कुलगुरू पदाचा कार्यभार स्‍वीकारल्‍यानंतर कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी त्‍वरीत प्रस्‍ताव तयार केला. त्यास मंजुरी मिळाली असून रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्‍या कामाचा शुभारंभ करण्‍यात आला.

यावेळी कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठातील जमिनीची प्रत ओळखुन रस्ते मजबुतीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम अद्यावत मानांकाप्रमाणे अतिशय उत्कृष्ट करण्‍याच्या सूचना संबंधित यंत्रणेस दिली. विद्यापीठात शहरातील नागरिक, राज्य आणि देशपातळीवरील कृषि तज्ञ, राजकीय, प्रशासकीय अधिकारी नियमित येतात. याबाबीचा विचार करून बांधकाम गुत्‍तेदारांनी उच्‍च दर्जाचे रस्‍ता मजबुतीकरण काम करावे असे आवाहन केले. प्रास्‍ताविकात विद्यापीठ अभियंता इंजिनियर दीपक कशाळकर यांनी रस्‍ते मजुबतीकरण मानांकाप्रमाणे होण्‍याच्‍या दृष्‍टीने वेळोवेळी यंत्रणेव्‍दारे मुल्‍यांकन करण्‍यात येणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संचालक (बियाणे) डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव पुरभा काळे, नियंत्रक प्रवीण निर्मळ, शाखा अभियंता शेख अहमद, विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR