40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडा‘इशान’दार षटक; गब्बरचा त्रिफळा!

‘इशान’दार षटक; गब्बरचा त्रिफळा!

मोहाली : दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने डावाच्या पहिल्याच षटकात १७ धावा कुटल्या. जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवनची जोडी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती. पण, यजमान संघासाठी इशांत शर्मा काळ ठरला. अनुभवी भारतीय गोलंदाजाने त्याच्या दुस-या षटकात धवनचा त्रिफळा तर बेअरस्टोला धावबाद केले. इशानने दुस-या षटकात दोन बळी घेऊन आपल्या संघाचे पुनरागमन केले. पण सहाव्या षटकात क्षेत्ररक्षण करताना इशानचा पाय मुरगळला आणि त्याला मैदानाबाहेर व्हावे लागले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १७४ धावा केल्या. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर (२९), मिचेल मार्श (२०), शाई होप (३३), रिषभ पंत (१८), रिकी भुई (३), ट्रिस्टन स्टब्स (५), अक्षर पटेल (२०) आणि सुमित कुमारने (२) धावा केल्या.

पाहुण्या संघाकडून होपने ३३ धावांची खेळी करून यजमानांना आव्हान दिले पण त्यालाही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मग दिल्लीने अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला आणि त्याने शेवटचे षटक गाजवले. पंजाबकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप स्ािंग यांनी सर्वाधिक २-२ बळी घेतले, तर कगिसो रबाडा, हरप्रीत बरार आणि राहुल चाहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. पंजाबसमोर विजयाने सुरुवात करण्यासाठी १७५ धावांचे आव्हान आहे.

पंजाब किंग्जचा संघ –
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्ंिहगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ –
रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद आणि इशांत शर्मा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR