32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयपंजाबला इतका दीर्घ कालावधी का?

पंजाबला इतका दीर्घ कालावधी का?

मतदान थेट अखेरच्या टप्प्यात विरोधकांचा सवाल

चंदिगड : पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा असून तिथे सर्वाधिक ८ खासदार काँग्रेसचे आहेत. या राज्याच्या निवडणुका अखेरच्या टप्प्यात १ जूनला होणार आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये तयारी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा अवधी राजकीय पक्षांना मिळणार आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. २०२४ च्या या निवडणुकीत काँग्रेसलाआपल्या ८ जागा कायम राखण्याचे, तर भाजपला आपली संख्या दोनवरून पुढे वाढविण्याचे आव्हान राहणार आहे. अवघ्या १३ जागा असलेल्या पंजाबची निवडणूक सर्वांत शेवटच्या टप्प्यात घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळावा, हाच यामागील सत्ताधारी पक्षाचा हेतू असावा, असा सूर विरोधी पक्षांकडून आळवला जात आहे.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपची शिरोमणी अकाली दल पक्षासोबत युती होती. यंदा भाजप १३पैकी ५ जागांवर अडून बसल्याने युतीची गणिते अजून जुळलेली नाहीत. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखविंदरसिंह बादल यांनी पंजाबमध्ये रथयात्रा सुरू केली असून ते जनमत आजमावत आहेत. या रथयात्रेचा समारोप झाल्यानंतर चंडीगड येथे शिरोमणी दलाची बैठक होईल. त्यात भाजपसोबत युती करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR