32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीजिंतूर कृ.उ.बा.समितीचे काम बंद आंदोलन

जिंतूर कृ.उ.बा.समितीचे काम बंद आंदोलन

जिंतूर : जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचा-यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारने सन २०१८ साली जो विधेयक क्रमांक ६४ लवकरच आणणार असल्याच्या विरोधात दि.२६ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतमालाची दिवसभर खरेदी विक्री बंद होती. त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट पहावयास मिळाला.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये महाराष्ट्र कृषी पणन (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या विधेयकामुळे शेतकरी, शेत मजूर व कर्मचा-यांवर अन्याय होणार असल्यामुळे या विधेयकाच्या विरोधात एक दिवसीय काम बंद करून लाक्षणिक संप करण्यात आला आहे. या संपात एस. बी.काळे, जि.के. हरगावकर, ए.आर कारंजकर, एस जे. सरकेट, अनुराधा मुळे, डि. बी. वाघ, पि.ए. प्रधान, ए.बी.पवार, एम एम. शिंदे, पि.डी. जगताप, एस. पी.कुटे, एम बी. दराडे, एस. एन काळे, बि.डि. पानझडे, श्रीमती एस. एम.राठोड, पि. व्ही. शेळके, पि. व्ही. गारकर, पि.डी. राठोड, पि.एस. शिंदे, एच एन मिर्झा, एन बी. केशरखाने, बि.एस. कापुर, आर. एन. मुजमुले आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR