32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर

शिवसेना ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील १७ उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.

ठाकरे गटाचे शिलेदार
बुलडाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
सांगली – चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गिते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई

ठाकरे गटाकडून आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण अद्याप चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या वतीने मिळत आहे. अशातच ठाकरेंकडून कल्याणच्या जागेसाठीही अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरेंकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR