38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रमहादेव जानकर पुन्हा महायुतीत

महादेव जानकर पुन्हा महायुतीत

आता नेमकं कुठून लढणार?

पुणे : सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महादेव जानकर बारामतीतून लढणार की परभणीतून? याची उत्सुकता आहे. चर्चा बारामती असली तरी जानकर परभणीतून लढणार अशी चर्चा आहे. कालपर्यंत भाजपने धोका दिला असे सांगणारे महादेव जानकर मविआच्या दारातून पुन्हा महायुतीत परतले आहेत.

रासपचे नेते महादेव जानकर यांची शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. यानंतर जानकर नेमके कुठून लढणार? याची चर्चा सुरू झाली. सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महादेव जानकर बारामतीतून लढणार की परभणीतून उभे राहणार? याची उत्सुकता आहे. चर्चा बारामती असली तरी जानकर परभणीतून लढणार अशी चर्चा आहे. कालपर्यंत भाजपने धोका दिला असे सांगणारे महादेव जानकर मविआच्या दारातून पुन्हा महायुतीत आले आहेत.

पण रासपच्या जानकरांना महायुतीत घेण्यामागे मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव जानकर यांना बारामतीमधून तिकिट मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकर लढू शकतात. मात्र असे असले तरी महादेव जानकर मात्र परभणीतूनच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ३१ मार्चला जानकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR