34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयपुरुषांच्या तुलनेत महिलांचे धुम्रपान सोडणे अवघड

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे धुम्रपान सोडणे अवघड

निकोटिन महिलांना लवकर जाळ्यात ओढतो युनिव्हर्सिटी ऑफ केंटकीतील संशोधकांचा शोध

नवी दिल्ली : पुरुषांपेक्षा महिलांना सिगरेट सोडणे अधिक कठीण जाते असा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ऑफ केंटकीतील एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. संशोधकांनी असे सुचवले आहे की, महिलांमधील सेक्स हॉर्मोन, इस्ट्रोजेन हे निकोटिनचे व्यसन लागण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

संशोधकांना असे आढळले आहे की, महिलांना निकोटिनचे व्यसन पुरुषांपेक्षा लवकर लागते, तसेच त्यांना हे व्यसन सोडणे खूप जड जाते. संशोधन टीमचे नेतृत्व करणा-या सॅली पॉस यांनी ही असमानता दाखवली आहे. मेंदुशी संबंधित असलेले ऑल्फॅक्टोमेडिन प्रथिनांचा याच्याशी संबंध असल्याचा शोध त्यांनी लावला आहे. निकोटिन हे ऑल्फॅक्टोमेडिनची निर्मिती कमी करण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे इस्ट्रोजेन ऑल्फॅक्टोमेडिनला जास्त चालना देत असते. या तिघांमधील परस्परसंपर्काचा अभ्यास केल्यास महिलांना सिगरेट सोडण्यासाठी जास्त का झगडावे लागते याचा उलगडा होईल असे सॅली पॉस म्हणाल्या. अमेरिकन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री आणि मोलेक्लुलर बायोलॉजी जर्नलध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. महिलांमधील या समस्येशी तोंड देण्यासाठी नवी उपचार पद्धती आवश्यक असल्याचे या जर्नलमध्ये म्हणण्यात आलं आहे. या नव्या संशोधनामुळे महिलांमधील धुम्रपानाची सवय सोडवता येईल असेही यात म्हणण्यात आले आहे.

असमानता दूर करण्याचा प्रयत्न
सॅली पॉस या प्रोफसर टेरी डी हिंड्स ज्युनियर यांच्या नेतृत्त्वामध्ये काम करत आहेत. त्या म्हणाल्या की, आमच्या अभ्यासात असे आढळले आहे की महिलांना निकोटिनचे व्यसन अधिक लागते. त्यांना सिगरेट सोडण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागते. महिला निकोटिबाबत अधिक संवेदनाक्षम का आहेत याचा शोध घेऊन ही असमानता दूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

औषध निर्मितीचा मार्ग मोकळा
निकोटिच्या व्यसनाशी झुंजणा-या महिलांचे आयुष्य सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. इस्ट्रोजनच्या सहभागाचा आणि निकोटिनचा सहसंबंध समजून आल्यास यासंबंधी औषध निर्मितीचा मार्ग मोकळा होईल. नवीन औषध महिलांचे जीवन सुखकर करेल आणि निकोटिन सोडण्यासाठी मदत करेल अशी आशा आहे, असं सॅली पॉस म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR