32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयबसपाकडून १६ उमेदवारांची नावे जाहीर

बसपाकडून १६ उमेदवारांची नावे जाहीर

लखनौ : बहुजन समाजवादी पक्षाने आज (दि. २४) उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बसपाने सात मुस्लिम उमेदवारांना तिकिट दिले आहे. यामध्ये सहारनपूर जागेवर सपा-काँग्रेस आघाडीचे इम्रान मसूद यांच्या विरोधात माजिद अली यांना उभे केले आहे. कैराना लोकसभा मतदारसंघातून श्रीपाल स्ंिह यांचा सामना इक्रा हसनशी होणार आहे.

मुझफ्फरनगरमधून दारा सिंह प्रजापती, बिजनौरमधून विजेंद्र सिंह रिंगणात आहेत. सुरेंद्र पाल सिंग यांना नगीना(एससी)येथून बसपाकडून तिकिट मिळाले आहे. मोहम्मद इरफान सैफी यांना मुरादाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे. जीशान खान रामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

शौलत अली यांना संभल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बसपाने अमरोहा लोकसभा मतदारसंघातून मुजाहिद हुसैन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे कंवर सिंग तवर आणि सपा-काँग्रेस आघाडीचे दानिश अली यांच्याशी होणार आहे.

लोकसभेसाठी उमेदवारांची नावे अशी-
सहारनपूर – माजिद अली
कैराना – श्रीपाल सिंह
मुझफ्फरनगर – दारा सिंह प्रजापती
बिजनौर – विजेंद्र सिंह
नगीना – सुरेंद्र पाल सिंग
मुरादाबाद – मोहम्मद इरफान सैफी
रामपूर – झीशान खान
संभल – शौलत अली
अमरोहा – मुजाहिद हुसेन
मेरठ – देवव्रत त्यागी
बागपत -प्रवीण बन्सल
गौतम बुद्ध नगर – राजेंद्रसिंग सोळंकी
बुलंदशहर – गिरीशचंद्र जाटव
आमला – आबिद अली
पीलीभीत – अनीस अहमद खान ऊर्फ ​​फूलबाबू
शाहजहांपूर – डॉ. दोद्रम वर्मा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR