39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरलातूरच्या उपेंद्र आणि कृष्णाच्या ‘एआय’ बेस्ड स्मार्ट वॉचला पेटंट!

लातूरच्या उपेंद्र आणि कृष्णाच्या ‘एआय’ बेस्ड स्मार्ट वॉचला पेटंट!

लातूर : युवा अभियंते उपेंद्र कुलकर्णी आणि कृष्णा देशपांडे यांना केंद्र सरकारचे इनोव्हेशन कॅटेगरी मधील सेफ्टी सेंसर बेस्ड टचस्क्रीन मल्टीफिचर्ड ड्युअल मोड वॉच सिस्टीमला पेटेंट मिळाले आहे.

लॉकडाऊन काळात उपेंद्र आणि कृष्णा यांनी एकाच डिव्हाइसमध्ये एक आयडिया घेऊन स्मार्ट वॉच तयार करण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केले. या प्रकल्पाला केंद्र शासनाचे पेटंट मिळाले.

या वॉचमध्ये ३० पेक्षा अधिक फिचर्स आहेत. जसे की, रेडिएशन इंडीकेटर, स्विच पॅनेल, वाय-फाय राउटर, कॅमेरा, मायक्रो प्रोजेक्टर, स्पीकर, शॉक अब्सॉरबर, मायक्रोफोन, एल. डी. आर सेंसर, चार्जर सॉकेट, इमर्जन्सी बटन, सोलार पॅनेल, आरएफप्रोब, रिचार्जेबल बॅटरी, अँटिना, स्मार्ट ग्लास, अनालॉग घड्याळ, लॅम्प, युएसबी आदी फीचर्सचा समावेश आहे.

घड्याळ ‘एआय’वर आधारित…
या वॉचला विशेष सेंसरचा केला वापर आहे. जसे की, तापमान, ऑक्सिजन, हवा, गॅस लिकेज, स्मोक आणि फायर. शिवाय, यामध्ये असलेला अँटिना हा २० हर्टझ् ते ५ गिगाहर्टझ् फ्रिक्वेन्सीसाठी सपोर्ट करतो. आरएफ प्रोब उच्चतम विद्युत विकिरण समाविष्ट करून (रेडियो फ्रिक्वेन्सी) विकिरण, उपयुक्त सेंसर आणि सर्किट्री वापरून, विद्युत विकिरणाचे माप करतो. २७ ऑगस्ट २०२० पासून वॉच तयार करण्याचे काम केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR