30 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeअंतरराष्ट्रीययूएनएससीमध्ये दहशवाद्यांना वाचविले

यूएनएससीमध्ये दहशवाद्यांना वाचविले

भारताने केला चीनवर आरोप चीनची दुटप्पी भूमिका समोर

न्यूयॉर्क : व्हेटो पॉवर वापरून सुरक्षा परिषदेच्या यादीत दहशतवाद्यांची नावे समाविष्ट करू न देणा-या देशांचा भारताने यूएनएससीमध्ये निषेध केला आहे. चीनचे नाव न घेता भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या यूएनएससी दहशतवादाचा सामना करण्याचे आश्वासन देते. अशा परिस्थितीत, असे पाऊल अनावश्यक आणि दुटप्पीपणाचे आहे.

भारतीय प्रतिनिधी म्हणाले यूएनएससी दहशतवादाच्या यादीत समाविष्ट असलेल्या नावांची यादी जाहीर करते. मात्र, ज्यांची नावे नाकारण्यात आली त्यांच्याबाबत कोणतीही यादी किंवा कारण सार्वजनिक केले जात नाही. दहशतवादी साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात होता. दहशतवादी साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात होता.

भारताने म्हटले की यूएनएससीच्या अजेंड्यातून अनावश्यक गोष्टी काढून टाकण्याची गरज आहे. याशिवाय रुचिरा यांनी पुन्हा एकदा यूएनएससीमध्ये बदल करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या संयुक्त राष्ट्रांच्या सहयोगी संस्थांच्या नेतृत्वाबाबत घेतलेल्या निर्णयांमध्ये पारदर्शकता आणणे आवश्यकआहे. प्रत्येकाला त्याच्या निर्णयात सामावून घेतले पाहिजे. सुरक्षा परिषदेच्या अजेंड्याचा आढावा घेणे आणि त्यातून अनावश्यक गोष्टी काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे.

जागतिक शांततेला धोका
जागतिक सुरक्षा आणि शांततेला धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत यूएनएससीनेही पुढे जाण्याची गरज आहे. जे सभासद संघटनेतील बदलाला आडकाठी आणत आहेत त्यांनी एकत्र येऊन एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे.

चीनने रोखले
गेल्या वर्षी भारत आणि अमेरिकेने यूएनएससी मध्ये २६/११च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीरला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल-कायदा प्रतिबंध समितीच्या बैठकीत अमेरिकेने हा प्रस्ताव मांडला होता. भारत त्याचा सहकारी होता. मात्र, चीनने व्हेटो पॉवर वापरून तो फेटाळला. पाकिस्तानी दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रऊफ असगर ऊ​​​​​​र्फ ​​अब्दुल रौफ अझहर याचा संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याच्या अमेरिका आणि भारताने आणलेल्या प्रस्तावाला २०२२ मध्येही चीनने विरोध केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR