34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयचिन्हे, झेंडे, टोप्या आणि रुमालांचा बाजार सजला!

चिन्हे, झेंडे, टोप्या आणि रुमालांचा बाजार सजला!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार साहित्यांना उधाण ई कॉमर्समध्येही खरेदीची धुम

नवी दिल्ली/मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष, उमेदवारांनी प्रचार प्रारंभ केला आहे. पुढील दोन महिने देशभरात निवडणुकीचा ज्वर चढलेला दिसणार आहे. प्रचारासाठी लागणा-या विविध साहित्याला या काळात मागणी वाढलेली असते. त्यात आता ई-कॉमर्स कंपन्यांनीही उडी घेतली आहे. राजकीय पक्षांच्या साहित्याची जबरदस्त विक्री ई-कॉमर्स मंचांवरून सुरू आहे. राजकीय पक्षाचे नाव टाइप करा आणि हवे ते साहित्य घरबसल्या मागवा, असे चित्र आहे.

२०१९ च्या निवडणुकीत हा कल सुरू झाला. सर्वच साहित्य ऑनलाइन विकले जात असेल तर निवडणूक साहित्य का नको, असा प्रश्न निर्माण झाला. विक्रेत्यांनीच पुढाकार घेऊन या वस्तू आमच्या मंचवर टाकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रचारासाठी लागणा-या जवळपास सर्वच साहित्याचे दर ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत. प्रचार साहित्याची किंमत वाढली असल्याने उमेदवारांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे हा खर्चाचा ताळेबंद मांडताना उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. प्रचार साहित्यांच्या दुकानांवर सर्वपक्षिय नेत्यांचे कटआऊट आणि झेंडे एकत्र नांदताना दिसतात. पक्षांचे झेंडे ३० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत मिळतात. तर, खिशावर लावण्यासाठी निवडणूक चिन्ह, स्टिकर्स, प्रचार पत्रके, टोप्या या सा-याची किंमत गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा वाढलेली आहे.

या वस्तूंची जोरदार विक्री
ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून विक्री होणा-या वस्तूंत भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ, आपचे चिन्ह झाडू, काँग्रेसचे चिन्ह पंजा आणि राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ इत्यादींचा समावेश आहे. सर्व पक्षांचे रुमाल, दुपट्टे, पेंडंट, टी शर्ट, चिन्हांकित पेन आणि टोप्या यांचीही जोरदार विक्री सुरू आहे. समाजवादी पार्टीचा लोगो असलेल्या की-चेन, तृणमूलचे चिन्ह असलेले नाइट लॅम्प, माकपाचे वाहनांवर लावता येणारे झेंडे, इत्यादी साहित्यांचीही विक्री होत आहे.

पक्षाच्या वेबसाइटवरून साहित्याची विक्री
काही राजकीय पक्षांनी आपल्याच वेबसाइट्सवर आपल्या साहित्याची विक्री सुरू केली आहे. उदा. नमो मर्चंडाइज वेबसाइटवर नरेंद्र मोदींशी संबंधित अनेक वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. आता ऑनलाइन विक्री होत असल्यामुळे तिकडेही पुरवठा वाढला आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून वाढत मागणी आहे. निवडणूक रॅलीसाठीदेखील मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात.

७०% विक्रीत वाढ
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ४०%एकूण विक्रीतील वाटा हा निवडणुकीशी संबंधित साहित्यांचा आहे. ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल निवडणुकीच्या काळात होण्याचा अंदाज आहे. ६०० पेक्षा जास्त साहित्यांची विक्री दररोज एका पुरवठादाराकडे होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR