39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमनोरंजनआयपीएलच्या टॉप-४ संघांची अक्षय कुमारने केली भविष्यवाणी

आयपीएलच्या टॉप-४ संघांची अक्षय कुमारने केली भविष्यवाणी

नवी दिल्ली : सध्या भारतात १८ व्या सार्वत्रिक निवडणूकासह क्रिकेटचा सर्वात मोठा सण म्हणजेच आयपीएलच्या १७ व्या सत्राची रणधुमाळी सुरू आहे. आएपीएलच्या या स्पधेर्तील सर्व १० संघ सध्या प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लढत आहेत. तर अंतिम-४ मध्ये कोणते संघ पोहोचतील हे ठरवणे कठीण आहे. दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारने आयपीएलच्या टॉप-४ संघांची भविष्यवाणी केली आहे.

बॉलीवूडच्या खिलाडी कुमारने आयपीएल २०२४ च्या प्लेऑफ संघांच्या नावांची भविष्यवाणी केली आहे. वास्तविक, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत, यादरम्यान, दोघांनी माजी दिग्गज अष्टपैलू इरफान पठाण यांच्याशी खास संवाद साधला. यावेळी अक्षयने पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ मध्ये प्लेऑफमध्ये जातील अशी भविष्यवाणी केली.

चाहत्यांनी केल्या मजेदार कमेंट्स
दरम्यान, अक्षय कुमारने वर्तवलेल्या अंदाजावर चाहत्यांना खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत. खरं तर अक्षयने प्लेऑफसाठी अशा संघांची नावे ठेवली आहेत, ज्यांची आतापर्यंतची कामगिरी खूपच खराब आहे आणि हे संघ आयपीएलच्या पाँइन्ट टेबलमध्ये खालच्या क्रमांकावर आहेत. मुंबई, आरसीबी आणि दिल्लीने प्रत्येकी एकच सामना जिंकला आहे. अशा स्थितीत त्यांचा अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा अंदाज निश्चितच आश्चर्यकारक आहे. यामुळे एका यूजरने कमेंट करत लिहिले की, अक्षयला ज्या टीमचे नावे आठवली ते त्यांनी सांगितली. तर दुसरा यूजर म्हणाला की, अक्षय आयपीएल बघतच नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR