40.8 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयइंडिया आघाडीत मतभेद नाहीत, आम्ही एकत्रच : काँग्रेस

इंडिया आघाडीत मतभेद नाहीत, आम्ही एकत्रच : काँग्रेस

नवी दिल्ली : देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. मात्र मागील काही दिवसापासून आघाडीत सर्व काही ठीक चाललेले दिसत नाही. आघाडीच्या सदस्य पक्षांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरवात केली आहे. समाजवादी आणि आम आदमी पक्ष काँग्रेसवर टीका करत आहेत. आता याबाबाबत काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही सर्वजण एकत्रच आहोत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, आधी तुम्ही समजून घ्या की, इंडिया आघाडी स्थापना का झाली? भाजपला २०१४ मध्ये लोकसभेत ३१.८ टक्के मते मिळाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले. २०१९ मध्ये देखील त्यांना सुमारे ३७ टक्के मते मिळाली आणि सरकार स्थापन झाले. उर्वरित ६० टक्के लोकांना एकत्र आणावे आणि लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही ही आघाडी केली आहे. यामुळे आम्ही भाजपला बाहेरचा रस्ता दाखवू आणि आमची इंडिया आघाडी दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल.

पूर्वी भाजप म्हणायची की, आम्ही एकत्र येणार नाही, आता आम्ही एकत्र आलो आहोत तर ते म्हणत आहेत की, आम्ही वेगळे होऊ, पण आम्ही एकत्रच आहोत, असे तिवारी म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी एकत्रच निवडणूक लढणार आहे, त्यात कोणतीही शंका नाही. हे मी याआधीही स्पष्ट केले आणि आमची आघाडी लोकसभेसाठी आहे, हे पुन्हा एकदा सांगत आहे.

काही मुद्दे आहेत
प्रमोद तिवारी म्हणाले की, या आघाडीपासून फारकत घेण्याबाबत कोणीही बोलत नाही. सर्वजण एकत्रच आहेत. पण काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा करण्यात येईल. आम्ही सर्व मिळून लढू आणि जागावाटपावरून त्या गोष्टी सुटतील. कोण काय म्हणत आहे, याच्या तपशिलात मला जायचे नाही. पण कोणीही असे वक्तव्य करू नये, जे एकमेकांना अप्रिय असेल, असे ते म्हणाले.

तणाव तीव्र झाला?
पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. काही राज्यात युती करण्यासाठी आप आणि समाजवादी प्रयत्नशील होते, पण काँग्रेसने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. यावरून तणाव तीव्र झाला. समाजवादी सातत्याने काँग्रेसवर टीका करत असून आपनेही जोरदार प्रचार सुरु केला आहे. याआधी आम आदमी पक्षानेही युतीबाबत कठोर विधाने केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR