39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रसाता-यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर

साता-यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज भाजपने काही उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रामधून एकमेव उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधून सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता लागली होती, त्यावर आता पडदा पडला आहे.

सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत ब-याच दिवसांपासून वाद सुरू होता, त्यामुळे साता-याचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत होता, असे असले तरी उदयनराजे यांनी दिल्ली दरबारी जाऊन आपली दावेदारी भक्कम केली होती, यामुळे त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली होती. आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध त्यांचा सामना रंगणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठी मंगळवारी बारावी यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव आहे. मात्र सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या जागेवरून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायन राणे यांना अद्याप वेटिंगवरच ठेवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR