31.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजनउर्फीला मिळाले शाहरूखच्या सिनेमात काम?

उर्फीला मिळाले शाहरूखच्या सिनेमात काम?

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असते. तिच्या विचित्र फॅशन स्टाईलमुळे उर्फी नेहमीच चर्चेचा विषय असते. अशातच उर्फीने एक फोटो शेअर केला आहे जो पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उर्फीचा हा फोटो दुसरा तिसरा कोणाबरोबर नाही तर थेट बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानबरोबर आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सेल्फी फोटो असून स्वत: शाहरूखने हा सेल्फी क्लिक केला आहे. फोटो पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. उर्फी शाहरूखला कशी भेटली? शाहरूखने उर्फीला सिनेमा दिलाय? असे अनेक प्रश्न उर्फी आणि शाहरूखचा हा सेल्फी पाहून पडले आहेत.

उर्फी आणि शाहरूखच्या सेल्फीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण या फोटोमागचं सत्य कळल्यानंतर अनेकांना झटका बसला आहे. पहिल्यांदा हा फोटो पाहिल्यानंतर साहजिकच अनेकांच्या मनात काहीतरी गडबड आहे अशी शंका आली असेल. तर हो या फोटोमध्ये गडबड आहे.

उर्फी आणि शाहरूखची ही भेट खोटी आहे. दोघे प्रत्यक्षात भेटलेच नसून टेक्नॉलॉजीच्या मदतीने हा फोटो तयार करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक प्रमाणेच स्नॅपचॅट हे अ‍ॅप तरुणांमध्ये फेमस आहे. स्रॅपचॅटच्या मदतीने हा फोटो क्लिक करण्यात आला आहे.
स्नॅपचॅटवर एक फिल्टर आले आहे ज्यात शाहरूखचा चेहरा आहे. या फिल्टरचा वापर करून शाहरूखबरोबर सेल्फी काढता येतो. यात असे वाटते की शाहरूखने स्वत: सेल्फी क्लिक केला आहे. उर्फीने देखील याच फिल्टरचा वापर करून शायनिंग मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात काही ती शाहरूखला भेटली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR