Homeक्रीडाविनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली

मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

मुंबई : प्रतिनिधी
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली आहे. त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली असून ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कांबळीच्या जुन्या मित्रांनी आर्थिक मदतीसाठी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप देखील बनवला आहे. या ग्रुपमध्ये सचिन तेंडुलकर देखील आहे.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने दारू पिणे सोडले आहे. परंतु त्याची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. यामुळे सिगारेट ओढण्याची चूक कांबळी करताना दिसतो. यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला आहे. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात युरिनरी इन्फेक्शनचा उपचार केल्यानंतर ५४ वर्षीय विनोद कांबळी बरा झाला होता. त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. परंतु काही महिन्यांनंतर त्याची तब्येत पुन्हा बिघडली. त्याला नीट उभे राहणेही अवघड झाले होते.

कांबळीच्या मित्राने सांगितले की, डॉक्टरांच्या उपचारानंतर कांबळी थोडाफार चालू लागला आहे. परंतु स्मरणशक्तीची समस्या कमी झालेली नाही. त्याला आता जुन्या गोष्टी आठवत नाहीत. कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याने त्याला मेंदूचा धोका वाढला आहे.

कांबळीचा मित्र मार्क्स कूटो याने सांगितले की, मी जुन्या मित्रांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. यात बहुतेक माजी क्रिकेटपटू आहेत. ते नाव न जाहीर करता आर्थिक मदत करत असतात. विनोदची स्मरणशक्ती कमकुवत आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एखादी जुनी गोष्ट आठवण्यासाठी बराच वेळ लागतो. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी आहेत. त्यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका देखील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तो इच्छाशक्तीच्या बळावर उपचारांना प्रतिसाद देत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR