Homeधाराशिवआई तुळजाभवानीच्या गाभा-यातील दर्शन २० ऑगस्टपर्यंत बंद

आई तुळजाभवानीच्या गाभा-यातील दर्शन २० ऑगस्टपर्यंत बंद

भाविकांना आणखी १० दिवस वाट पाहावी लागणार मंदिर संस्थानचा निर्णय

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरातील सिंहगाभा-याच्या संवर्धनाच्या कामामुळे भाविकांना गाभा-यात जाऊन दर्शन घेता येणार नाही. मंदिर संस्थानने यासंदर्भात माहिती दिली असून आता २० ऑगस्टपर्यंत गाभा-यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. याआधी १ ते १० ऑगस्ट या कालावधीत गाभा-यातील दर्शन बंद ठेवण्यात आले होते. मात्र, संवर्धनाचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे दर्शन बंदीचा कालावधी आणखी दहा दिवसांनी वाढवण्यात आला आहे.

भाविकांना मात्र निराश होण्याचे कारण नाही. देवीचे मुखदर्शन, सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. देवीच्या सिंहाच्या गाभा-यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे. कारण, पुरातत्व खात्याकडून येथे काम सुरू करण्यात आले आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील १० दिवस भाविकांना मुखदर्शनच घेता येईल २० ऑगस्टनंतर गाभा-यातील नियमित दर्शन पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भाविकांना फक्त बा दर्शनावर समाधान मानावे लागणार आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख कुलदेवी असून, लाखो भाविक दररोज तिच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR