30.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयसंसदेचे हिवाळी अधिवेशन; खासदारांसाठी सूचना जारी

संसदेचे हिवाळी अधिवेशन; खासदारांसाठी सूचना जारी

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी राज्यसभा खासदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यसभेत उपस्थित होणाऱ्या विषयांची कोणतीही प्रसिद्धी करू नये, असे या निर्देशात म्हटले आहे. तसेच, जोपर्यंत सभापती नोटीस मंजूर करून इतर खासदारांना कळवत नाही तोपर्यंत नोटीस सार्वजनिक करू नये, असे सांगण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खासदारांना दिलेल्या सूचनांमध्ये संसदीय परंपरा आणि कार्यपद्धती नमूद करण्यात आल्या आहेत. राज्यसभेत कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी आतापर्यंत खासदार विशेषत: विरोधी पक्षाचे खासदार जाहीर नोटिसा देत होते, पण आता हे टाळण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जारी केलेल्या निर्देशांमध्ये, राज्यसभा सदस्यांसाठी एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या हँडबुकमध्ये नमूद केलेल्या संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींची आठवण करून देण्यात आली आहे. सभागृहात फलक लावण्यास बंदी आहे. तसेच सीटच्या मागचा भाग दाखवू नये. धन्यवाद, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा सभागृहात देऊ नयेत. सभापतींनी दिलेल्या व्यवस्थेवर सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका होऊ नये, असे म्हटले आहे. त्याचवेळी सभापती बोलत असताना कोणत्याही सदस्याने सभागृह सोडू नये. सभापती बोलत असताना सभागृहात शांतता असावी. सभागृहात दोन सदस्य एकत्र उभे राहू शकत नाहीत. सदस्यांनी थेट अध्यक्षांकडे येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

..तर जागा रिक्त घोषित केली जाऊ शकते
निर्देशांनुसार, राज्यसभेचे सदस्य परिचरांना स्लिप पाठवू शकतात. सभासदांनी लिखित भाषणे वाचू नयेत. सभागृहात सदस्यांची उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे. जर एखादा खासदार परवानगीशिवाय साठ दिवस गैरहजर राहिला तर त्याची जागा रिक्त घोषित केली जाऊ शकते, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR