जळकोट : प्रतिनिधी
जळकोट पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणा-या दोन टिप्परवर कारवाई केली आहे. हे दोन्ही टिप्पर जळकोट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. घोनसी येथील सर्र्व्हीस रोडच्या बाजूला जळकोट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दोन टिप्परमधील वाळूसह दोन्हीही टिप्पर जप्त करण्यात आले असून तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी एमएच २६ ८८८० चा चालक नामे गणेश शंकर पवार वय ३१ वर्ष रा. धावरी तांडा ता. लोहा जि. नांदेड तिरुमला दिगंबर डिकळे वय २७ वर्ष रा. पार्टी ता लोहा जि. नांदेड एमएच २६ सीव्ही २८७६ चा चालक नामे शिवाजी व्यंकटी आलट वय ४७ वर्ष रा. हारसद ता लोह जि नदिड . आबा रंगानाथ ढेबरे रा. बेरळी ता लोहा जि नांदेड या ४ जणांविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आरोपींनी संगणमत करून यातील चालक मालकाने पांढ-या व निळ्या रंगाचा दोन्ही टिपरमध्ये बेकायदेशीररित्या शासकीय विनापास परवाना रेतीची चोरटी वाहतूक करून अधिनियमान्वये दिलेल्या उपबंध व नियमांचे उल्लंघन करन गौण खनिज वाळू दोन्ही हायवा टिपरमध्ये भरुन स्वत:च्या फायद्याकरीता वाळूची चोरटी वाहतूक करीत असताना एकूण १० ब्रास वाळू प्रती ब्रास ५००० रुपयांप्रमाणे असे एकूण ५० हजार रुपये व सदर रेती वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन हायवा टिप्पर किंमत प्रत्येकी अंदाजे २५,००००० रुपये प्रमाणे असा एकूण ५०, ५०, ००० रुपयांच्या मुद्देमालासह गिळून आले.
नमूद आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (१), ३ (५) व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४० (७), ४८ (८) गुरन १३३/२०२६ कलम ३०३ (२), ३ (५) २०२३ सहकलम -४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्रगाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

