28.5 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeपरभणीक्रॉक्रीट रस्त्याच्या कामाची चौकशी करा : आ. बाबाजानी दुर्राणी

क्रॉक्रीट रस्त्याच्या कामाची चौकशी करा : आ. बाबाजानी दुर्राणी

पाथरी : नगर परिषदे अंतर्गत शहरातील विविध भागासाठी शासनाच्या वैशिष्टयपुर्ण योजनेतंर्गत सी.सी. रोड व सी.सी. नाली बांधकाम व प्लेवर ब्लॉक सिमेंट क्रॉक्रीट कामासाठी २५ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून झालेले बांधकाम निकृष्ट व दर्जाहीन झाले असुन याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी केली आहे.

पाथरी शहरातील विविध भागाता सीसी रोड व नाली आणि प्लेवर ब्लॉकचे बांधकाम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु सदरील कामे शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे दर्जाहीन पध्दतीने करण्यात आले आहे.

सिमेंट क्रॉक्रीटच्या कामात वाळु व सिमेंटचा वापर करण्यात आला नसल्याने सध्या या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सदरील ठेकेदारांनी गुणवत्ताहीन काम केले असुन आधुनिक यंत्र मशीनचा वापर करून सदरील कामाची गुणवत्ता तपासणी करणे गरजेचे होते. प्रशासनाकडे रिपोर्ट देणे गरजेचे होते. पण सीसी रोड व सीसी नालीच्या कामाची गुणवत्ता न बाळगता अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामे करण्यात आले आहे. याची तात्काळ दखल घेवून संबंधीत ठेकेदार व अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR