Homeलातूरपावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही याची दक्षता घ्या

पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही याची दक्षता घ्या

लातूर : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून मान्सुनपूर्व नाले सफाईचे काम युध्दपातळीवर करावे, अशी सुचना करुन पावसाचे पाणी निचरा होण्यास प्राधान्य देऊन शहरात कोठे ही पाणी थांबणार नाही  अथवा नाली तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी प्रशासनाला दिले आहेत. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरात मान्सुनपूर्व नाले सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची प्रत्येक्ष पाहणी करुन स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या सुचनेवरुन स्वच्छता विभागाला महत्वपूर्ण सुचना दिल्या.
गतवर्षी मान्सुनपूर्व पावसाने शहरात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबुन अस्वच्छता पसरली होती. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी नाले सफाई करताना पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची दक्षता घेऊन शहरातील कोणत्याही भागात नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येणार नाही यास प्राधान्य द्यावे असे निर्देश स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी दिले. विशेषत: रिंग रोडसह पाच नंबर चौक आणि समांतर रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते याकडे लक्ष वेधुन सभापती बंडापल्ले यांनी या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कायम स्वरूपी व्यवस्था करावी अशी सुचना दिली आहे. शहरातील प्रत्येक गल्ली बोळातील नाल्यांची सफाई होऊन या ठिकाणी कचरा अडकु नये याकरीता आवश्यक असणा-या उपाय योजना कराव्यात असे निर्देश देऊन या कामा मध्ये नगरसेवकांनी दिलेल्या सुचना ही लक्षात घ्याव्यात असे सांगुन नाले सफाईच्या कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये अशी अपेक्षा स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी व्यक्त केली. यावेळी उपायुक्त वसुधा फड यांनी नालेसफाईचे काम ७० टक्के पुर्ण झाले असल्याची माहिती देऊन सभापतींनी केलेल्या सुचने नुसार सर्व कामे वेळेत पुर्ण करण्यात येतील असे सांगीतले.
शहरातील काही भागात नालीवरील पुलावर पाणी साचुन वाहन धारकांचे अपघात होतात. या बाबत खबरदारी घेण्यासाठी शहरातील अशा ठिकाणांची पाहणी पोलीस अधीक्षक यांच्या सुचने नुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले व मनपाच्या अधिका-यांनी संयुक्त पाहणी केली. जेथे जेथे नाल्या तुंबून पुलावर पाणी येते तेथील नालीसफाई करताना प्रशासनाने काळजी घुऊन तेथील अडचण कायम स्वरुपी सोडवावी अशा सुचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व सभापती सचिन बंडापल्ले यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR