34 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeपरभणीबसवेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन

बसवेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन

कौसडी : बोरी ते कौसडी रस्त्यावरील बसवेश्वर मंदिरात ८ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन हभप दयानंद गिरी महाराज यांनी केले आहे.

हे मंदिर प्राचीन काळातले असून या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. या महादेव मंदिरात दर्शनासाठी परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने येतात.

नवसाला पावणारा हा महादेव असून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. महाशिवरात्री निमित्त ८ मार्च रोजी महादेव मूर्तीला अभिषेक कौसडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच दि. ९ मार्च रोजी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन पुजारी हभप दयानंद गिरी महाराज यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR