28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeलातूरहोळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज

होळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज

उदगीर : बबन कांबळे
देशभरात होळीचा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाच्या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात. यंदा होळी सण २४ मार्चला तर धूलिवंदन २५ मार्चला आहे. यापार्श्वभूमीवर उदगीर शहरातील बाजारपेठ होळीच्या साहित्यांनी सजल्या आहेत.

बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, स्प्रे, मुखवटे, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या पिचका-या, गाठया दाखल झाल्या आहेत. या साहित्यांची खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात होळीचे साहित्य दाखल झाले आहे. विशेषत: पिचका-या, विविध रंग, मास्क, टिमक्या साहित्यांनी बाजारपेठ बहरू लागली आहे. त्याचबरोबर लहान बालकांना आकर्षित करणा-या पिचका-या आणि विविध मास्कही दिसू लागले आहेत. होळीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसतशी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. सणासाठी गुलाबी, निळा, जांभळा, भगवा, पिवळा यासह नैसर्गिक रंगांची आवक वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR