परभणी : प्रतिनिधी
निम्न दूधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी ८ वाजता धरणाचे गेट क्र. ०१ व २० हे प्रत्येकी ०.२० मीटरने उघडण्यात आले. यामुळे १,३१९.३७ क्युसेस (३७.३६ क्यूमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग दूधना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
धरणात पाण्याची सतत वाढणारी आवक लक्षात घेऊन परिस्थितीनुसार विसर्गात वाढ अथवा घट केली जाणार असल्याचे निम्न दूधना धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

