37.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeलातूरअरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

निलंगा : प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी आपल्या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांनी भाऊ गर्दी करत वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या, क्रिकेट, आरोग्य शिबिर, किर्तन आदींचे आयोजन करण्यात आले होते. तर आज दि. ९ मार्च शनिवार रोजी सकाळी ७.३० वाजता ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदीरात अभिषेक, तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज व  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे अभिवादन, पिरपाशा दर्गा, दादापीर दर्गा येथे चादर अर्पण, स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
 तर अंबुलगा (बु) येथे दिवसभर भव्य मोफत आरोग्य शिबीर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तालुक्यातील आरोग्य केंद्रात फळवाटप व विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर कासार शिष्याचे भव्य कुस्ती दंगल भरवण्यात आली. अरविंद पाटील निलंगेकर सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत जनसेवा कार्यालयात निलंगा येथे उपस्थित राहून मतदारसंघातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ तालुक्यासह लातूर जिल्ह्यातून आलेल्या भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शुभेच्छा देण्यासाठी पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी भाऊ गर्दी करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी, वकील, पत्रकार आदींनी भाऊ गर्दी करत उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार, उपसभापती शाहूराज थेटे, शासकीय ठेकेदार एन. आर. काळे, भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, गजानन देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष आमिर पटेल, संतोष पाटील, बालाजी मोरे, जनार्धन सोमवंशी, किशोर लंगोटे, मनोज कोळ्ळे, सुमित इनानी, बंकट बिरादार, अबू तुंगे, विनोद सोनवणे, अंकुश धनुरे, तम्मा माडीबोणे, शरद पेटकर, सुभाष डावरगावे, नागेंद्र पाटील, पिंटू पाटील, युवराज पवार, शेषराव ममाळे, वीरभद्र स्वामी, उपसरपंच सुधाकर चव्हाण, भंपू चव्हाण आदीसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व चहात्यांनी उपस्थित राहून अरविंद पाटील यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR