34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीपरभणी शहरातील सिग्नल व सीसीटीव्ही लवकरच सुरू करणार

परभणी शहरातील सिग्नल व सीसीटीव्ही लवकरच सुरू करणार

परभणी / प्रतिनिधी
परभणी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून पोलिस दलाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये पोलिस अंमलदारांना प्रशिक्षण देवून तो सोडविण्याला विशेष प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय शहरातील मुख्य चौकांमधील बंद असलेले असलेली सिग्नल व सीसीसीटी लवकरच सुरू करण्यात येतील. तसेच गुन्हे रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मोठी गावे व चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या ६ महिन्यात हे काम पुर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रविंदसिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना केले आहे.

नूतन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शनिवार, दि.९ 9) पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, परभणी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत सुरूवातीला पोलीस अधीक्षक परदेशी यांनी पत्रकारांनी केलेल्या काही सूचनांची दखल घेत त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकारी नेमण्यात येईल असे सांगितले. तसेच परभणी जिल्ह्यातील प्रश्न समजून घेत प्राधान्याने ते सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे यावेळी सांगितले.

परभणी शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत करण्यात आलेली एकेरी वाहतूक व्यापा-यांच्या दृष्टीने अडचणीची ठरत असून वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले की, त्यासंदर्भात प्रायोगिक तत्वावर कार्यपध्दती निश्चित केली जात असून हा रस्ता दुहेरी करण्यासाठी मनपा आयुक्तांना पत्रही दिले आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व चोरीचा प्रश्नही मोठा असून यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी यांच्यांसोबत पोलीस विभागाची बैठक झाली आहे. त्यानुसार महसूल व पोलीस प्रशासन संयुक्तपणे कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी दिली. स्क्रॅपमधील ऑटोरिक्षा रस्त्यावर येंत असल्याने होणारे प्रदूषण, अवैध दारूविक्री बरोबरच शाळकरी मुलांपासून ते युवकांमधील वाढती व्यसनाधिनता हा सामाजिक प्रश्न लक्षात घेवून हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR