36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeलातूरकत्ती घेऊन फिरणा-या दोघांवर गुन्हा दाखल 

कत्ती घेऊन फिरणा-या दोघांवर गुन्हा दाखल 

औसा : प्रतिनिधी
लातूर येथील दोन युवकांनी हातात कत्ती व काठी घेऊन औसा शहरात फिरत असल्याने या दोन युवकांना हत्यारासह औसा पोलिसांनी अटक केली. लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने पोलीस अधीक्षक  सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक  डॉ.अजय देवरे,  औसा  उपविभागीय पोलिस अधिकारी  सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील रेजीतवाड, अधिकारी अमलदारांचे पथक तयार करुन अवैध शस्त्र बाळगणा-या व्यक्ती विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीवरुन औसा शहरातील या याकतपूर मोड परिसरात दोन युवक हातात धारदार कत्ती व काठी घेऊन दहशत निर्माण करीत फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने तात्काळ याकतपूर मोड परिसरात जाऊन हातात धारदार लोखंडी कत्ती व काठी घेऊन फिरणारे युवक रसूल खय्युम शेख, वय २३ वर्ष, राहणार कव्वा नाका, लातूर. लखन कैलास रणदिवे, वय ३२ वर्ष, राहणार माताजी नगर, लातूर. यांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लोखंडी धारदार कत्ती व एक काठी मिळून आली. सदरची कत्ती व काठी जप्त करण्यात आली असून सदर युवकावर पोलीस ठाणे औसा येथे कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे  व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून १३५ मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोईनवाड हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR