28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

कोल्हापूर : कडक उन्हाचा मारा असतानाही सोमवारी संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपल्या ताकतीची चुणूक दाखवली.

महायुतीच्या वतीने कोल्हापूर मतदारसंघात संजय मंडलिक व हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही खासदारांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर गेले पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडला होता. सभा, मेळावे, पदयात्रा यांना जोर आला होता.

तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी आज सकाळी गांधी मैदान येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिंदे शिवसेना, अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही उपस्थिती लावली होती. तेथून वाद्याच्या गजरात मिरवणूक निघाली. शिवसेना पुन्हा सत्तेत हे नवे गीत जागोजागी वाजवले जात होते. उन्हाचा पारा तापलेला असतानाही गर्दी झाली होती. भगवे, निळे झेंडे फडकत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR