30 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरजीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, २ जण गंभीर जखमी

जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, २ जण गंभीर जखमी

निलंगा : प्रतिनिधी
तिरुपतीहून देवदर्शन करून औशाकडे जाणा-या ट्रॅक्स गाडीने निलंग्यातील एचडीएफसी बँकेसमोर पाठीमागून दुचाकीला धडक मारल्याने तिघे गंभीर जखमी झाले असून एकाचा लातूर येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी सांगितले. दि २६ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास जगदीश सिंग सुरमका सिंग टाक व ४० वर्ष, राजू सिंग ठाकूर सिंग टाक वय ३८ वर्षे, काशिनाथ नारायण माळी वय ४५ वर्ष राहणार निलंगा हे तिघे दुचाकीवरून घराकडे जात असताना मागून येणा-या ट्रॅक्स गाडीने (एमएच २४ ५ ५२३६) या क्रमांच्या जीपने पाठीमागून धडक दिल्याने यात दुचाकीवरील तिघे जखमी झाले. या जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता यातील गंभीर जखमी असलेले राजू सिंग ठाकूर सिंग टाक यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी सांगितले.

दूस-या निलंगा येथे पारिवारिक कार्यक्रम आटोपून घराकडे येत असताना स्कुटी चालक महिला व पाठीमागे बसलेली आजीबाई यांना एका कारने धडक देऊन पळ काढला यात दोघीजणी गंभीर जखमी झाल्याने निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून तातडीने लातूर येथे उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.

निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मौलाना बेग व पोलीस हेडकॉन्स्टेबल धोंडीराम कांबळे हा दोन्ही परिवार पारिवारिक कार्यक्रम आटपून पोलीस वसाहतीकडे वाहनावर जात असताना हा अपघात झाला. बेग यांची कन्या स्कुटी चालवत होती तर कांबळे यांची आई पाठीमागे बसली होती यांची गाडी जिजाऊ चौक दरम्यान येतात औराद शहाजनीच्या दिशेने भरधाव वेगात जाणा-या कारचालकाने (१४ बीके ७२०४) या क्रमांकाच्या स्कुटीला धडक देऊन बेफाम वेगात निघून गेला. यावेळी जखमी अवस्थेत पडलेल्या सायमा मौलाना बेग वय २२ वर्ष व शेषाबाई झंिटग कांबळे वय ८५ वर्षे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र जखमीची परस्थितिी गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे रवाना करण्यात आले. यातील शेषाबाई झटींग कांबळे यांचा मृत्यू झाला. पळून गेलेल्या कारला औराद शहाजनी पोलिसांनी सापळा रचून पकडले. या जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शैलेश वजीर, अफरोज शेख, नाना आकडे, लतीफ शेख या युवकांनी मदत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR