Homeमहाराष्ट्रदेशाची चौकशी यंत्रणा सक्षम; पंकज भोयर

देशाची चौकशी यंत्रणा सक्षम; पंकज भोयर

मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्यासारखे नेते अपघातात गेल्यानंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून अनेक वेगवेगळी विधाने करण्यात आली. रोहित पवारांनी काल त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पण त्यांचे नेते शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितले आहे की आपल्या ज्या संस्था आहेत ज्या चौकशी करत आहेत त्या सक्षम आहेत, यात जर काही चुकीचे घडले असेल तर संबंधितावर कारवाई करण्यात येईल. विमान कंपनीबाबत डीजीसीएच्या अहवालानंतर चौकशीचा निर्णय होईल, असेही भोयर यांनी म्हटले आहे.

पंकज भोयर म्हणाले की, विमान अपघात प्रकरणी जे जे विभाग असतात त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. आपल्या देशातील चौकशी संस्था या सक्षम आहेत चौकशीतून जे काही घडले ते समोर येईल.

सुनेत्रा पवारांबद्दलचा निर्णय राष्ट्रवादीचा
पंकज भोयर म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि पुढील घडामोडी घडल्या असे म्हणत त्यांनी रोहित पवारांनी केलेला दावा खोडून काढला. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री व्हायचे नव्हते, असे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR