27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत रितू तावडे यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार

मुंबईत रितू तावडे यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार

मुंबई : प्रतिनिधी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबईला आज अखेर महापौर मिळाला आहे. भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. आज त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हातून पदभार स्वीकारला. त्यामुळे मुंबईतील प्रशासक राज संपुष्टात आले असून आता मुंबईत मेयर राज सुरू झाले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीने महापौरपदाचं बहुमत मिळवलं होतं. त्यामुळे भाजपचा महापौर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर भाजपने रितू तावडे यांची भाजपचे महापौरपदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले तर शिंदे सेनेने संजय घाडी यांचे उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले. मात्र, संख्याबळा अभावी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही. त्यामुळे या निवडणुकीत विरोधात एकही अर्ज आला नसल्याने तावडे आणि घाडी यांची बिनविरोध निवड झाली.

आज या दोघांनीही औपचारिकपणे महापौरपदाची सूत्रे स्वीकारली.
या निवडीनंतर रितू तावडे या भाजपच्या मुंबईच्या दुस-या महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी १९८२ मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे मुंबईचे पहिले महापौर झाले होते. त्यानंतर रितू तावडे यांना भाजपच्या दुस-या महापौर बनण्याचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर बनण्याचा मानही तावडे यांना मिळाला आहे. रितू तावडे या घाटकोपरच्या नगरसेविका आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिले होते. त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR