36.3 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरभावाच्या आत्महत्येप्रकरणी संशयितास कोठडी

भावाच्या आत्महत्येप्रकरणी संशयितास कोठडी

सोलापूर: नळाचे पाणी भरणे व नळपट्टीवरून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणावरून पहिल्यांदाच पोलिस ठाण्यात गेलेल्या दुसऱ्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या मयताच्या सख्ख्या भावास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सुधाकर नागेश येरटे (वय ५३, रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे. तर शिवानंद नागेश येरटे असे न्यायालयीन कोठडी मिळालेल्याचे नाव आहे.

भवानी पेठेतील मड्डी वस्ती येथे शिवानंद व सुधाकर हे दोघे सख्खे भाऊ शेजारी राहतात. घर जागा, नळ कनेक्शन व त्याचा टॅक्स यावरून त्यांच्यात सतत किरकोळ वाद होत होते. ६ एप्रिल रोजी शिवानंद याने भाऊ सुधाकर, त्याची पत्नी सुनिता, मुलगा प्रविण व अन्य एकाविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावरून भाऊ सुधाकर त्याची पत्नी व मुलाविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संशयितांना पोलिसांनी चौकशीला बोलावले. त्यानंतर ७ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सुधाकर यांनी देखील शिवानंदविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली. पण, भावाने वेगवेगळे काहीही सांगून फिर्याद दिल्याने सुधाकर यांच्या मनात अटक व शिक्षेची भीती होती.

त्यांनी रविवारी रात्री मुलालास्वतःच्या मोबाइलवरून व्हाइस मेसेज केला, पण मुलाने तो सकाळी पाहिला. तोवर वेळ निघून गेली होती, जोडभावी पेठ पोलिस तपास करीत आहेत.शिवानंद येरटेच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ठाण्यात बोलावले. पहिल्यांदाच पोलिस ठाण्याची पायरी चढलेल्या सुधाकरच्या मनात अटकेची व शिक्षेची भीती होती. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसांनाही विचारणा केली. त्यावेळी हा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा आहे, घाबरू नका, असे पोलिसांनी समजावून सांगितले होते. तरीही सुधाकर यांनी टोकाचा निर्णय घेतला

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR