36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाशक्ती अजितदादांना हळूहळू संपवतेय

महाशक्ती अजितदादांना हळूहळू संपवतेय

पुणे : प्रतिनिधी
लोकसभेच्या जागांसाठी महायुतीमध्ये अजित पवार यांना अक्षरश: हात पसरावे लागत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांना टोला लगावला आहे. महाशक्ती आज लोकसभेसाठी त्यांना मॅनेज करेल आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. एरवी रुबाबदारपणे निवडणुकीची तिकिटे वाटणा-या अजितदादांना आता तिकिटांसाठी हात पुढे करावे लागत असतील आणि तेही चाराणे हाती टेकवल्याप्रमाणे चार तिकिटे पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणा-यांचाही हा अवमान आहे,
असे रोहित पवार यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय याबद्दल त्यांचा एकेकाळचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दु:ख वाटते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR