Homeक्रीडाराजस्थानचा प्रथमच विजयी रथ रोखला

राजस्थानचा प्रथमच विजयी रथ रोखला

हैदराबाद : वृत्तसंस्था
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. या सामन्याची नाणेफेक हे राजस्थानच्या संघाने जिंकली आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २१६ धावा केल्या. लक्ष्यप्राप्ती करताना राजस्थानचा संघ अपयशी ठरला. त्यांना ५७ धावांनी सामना गमवावा लागला.

राजस्थानच्या संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट गमावल्या. त्यामुळे अतिशय वाईट सुरुवात झाली. आयपीएल २०२६ च्या २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ५७ धावांनी पराभूत केले. रियान परागच्या कर्णधारपदाखाली राजस्थानचा हा पहिला पराभव ठरला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम खेळताना सनरायझर्स हैदराबादने ६ गडी गमावून २१६ धावा केल्या. राजस्थानने पहिल्या तीन षटकांत ५ गडी गमावले. १९ व्या षटकात संघाचा डाव १५९ धावांवर बाद झाला. चार सामन्यांनंतर या हंगामातील राजस्थानचा पहिला पराभव झाला. संघ ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. हैदराबादचा ५ सामन्यांतील हा दुसरा विजय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR