38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूररेल्वेस्थानकांवर मीळणार गहू, तांदळाचे पीठ

रेल्वेस्थानकांवर मीळणार गहू, तांदळाचे पीठ

सोलापूर : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता खाद्यपदार्थांसह ‘भारत आटा’ आणि तांदळाच्या पिठाची विक्री नियमित सुरू करण्यात येईल. मोबाईल व्हॅनद्वारे स्टेशन परिसरात पीठ आणि तांदूळ विक्री केली जाईल. मोबाईल व्हॅनद्वारे विकले जाणारे पीठ आणि तांदूळ या दोन्हींच्या किंमती निश्चित करण्यात आल्याने सोलापूर रेल्वेस्थानकावर लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्राने सर्वसामान्यांना स्वस्त दरात ‘भारत आटा’ म्हणजेच गव्हाचे पीठ आणि ‘भारत तांदूळ’ पुरवण्याची योजना आणण्याची घोषणा केली होती. आता रेल्वे स्टेशनवर तुम्हाला हे गव्हाचे पीठ आणि तांदूळ स्वस्त दरात मिळणार आहेत. रेल्वेने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये तुम्हाला स्टेशनवरही ‘भारत आटा’ आणि तांदूळ मिळणार आहे. केंद्र सरकारद्वारे पुरवला जाणारा ‘भारत तांदूळ’ पाच किलो आणि १० किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध असेल. सरकारकडून तांदूळ आणि ‘भारत आटा ‘सोबतच ‘भारत चना’ ६० रुपये प्रती किलो दराने विकला जाईल.मोबाईल व्हॅनद्वारे विक्री होणार आहे. सर्वसामान्यांना स्वस्त दरात गव्हाचे पीठ व भारत तांदूळ मिळेल.सोलापूर रेल्वेस्थानकावर लवकरच सेवा सुरू होणार आहे.

या योजनेस लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही योजना नियमित सुरू करण्यात येईल. मोबाईल व्हॅनद्वारे स्टेशन परिसरात पीठ आणि तांदूळ विक्री केली जाईल. मोबाईल व्हॅनद्वारे विकले जाणारे पीठ आणि तांदूळ या दोन्हींच्या किंमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये तुम्हाला भारत ब्रँडचे पीठ २७.५० रुपये प्रती किलो दराने मिळेल. त्याचवेळी तांदळाची किंमत २९ रुपये प्रती किलो असेल.केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात आहेत. गरीब लोकांना मदत करणे आणि देशाचा विकास करणे हा या योजनांचा उद्देश आहे. सोलापूर रेल्वेस्थानकावर ‘भारत तांदूळ’ व ‘भारत गह’ या योजनेसाठी जागा निश्चिती केली जात आहे. लवकरच ही सेवा सुरू करण्यात येईल. असेवरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR