34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeधाराशिवनळदुर्ग येथे सावत्र आईकडून १० वर्षीय मुलाचा खून

नळदुर्ग येथे सावत्र आईकडून १० वर्षीय मुलाचा खून

धाराशिव : प्रतिनिधी
सावत्र आईने १० वर्षीय मुलाचा पाण्याच्या हौदात बुडवून खून केला. ही घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे दि. १० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात सावत्र आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी आईला अवघ्या चार तासात अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नळदुर्ग शहरातील १० वर्षीय शिवमल्हार दयानंद घोडके हा दि. २८ मार्च रोजी रात्री त्यांच्या घरासमोरील ज्योर्तिलिंग ज्वेलर्स दुकानासमोर त्याच्या वडीलासह झोपला होता. सकाळी त्याच्या वडीलास झोपलेल्या ठिकाणी शिवमल्हार हा दिसला नाही. त्याच्या वडीलांनी व नातेवाईकांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता त्यांच्या घराजवळील बांधकाम चालू असलेल्या हौदात त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीस ठाणे नळदुर्ग येथे अपघाती मृत्यू म्हणून सुरूवाातीला नोंद घेण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदशर्नाखाली या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. शिवमल्हार घोडके याचा अपघाती मृत्यू आहे की खून आहे, याचा तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कासार यांना गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले की, शिवमल्हार दयानंद घोडके याचा त्याची सावत्र आई सुंदरबाई दयानंद घोडके यांनी खून केला. कौटुंबिक वादातून शिवमल्हार हा झोपेत असताना त्याला उचलून नेवून शेजारील नवीन चालू असलेल्या बांधकामावरील पाण्याच्या हौदात बूडवून ठार मारले आहे. आरोपीस पथकाने ताब्यात घेवून तिच्याकडे गुन्ह्यासंदर्भाने चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कार्यवाहीसाठी आरोपी महिलेस नळदुर्ग पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोहेकॉ शौकत पठाण, फरहान पठाण, प्रकाश औताडे, विजयकुमार घुगे, शोभा बांगर, पोलीस अमंलदार योगेश कोळी, नितीन भोसले यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR