30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरशहरातील दवाखाने, हॉस्पिटल्सनी नोंदणी करणे आवश्यकच : लोकरे

शहरातील दवाखाने, हॉस्पिटल्सनी नोंदणी करणे आवश्यकच : लोकरे

सोलापूर : जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन सेवेसाठी महापालिकेची ऑनलाईन सेवा उपलब्ध उपलब्ध आहे. दवाखाने, हॉस्पिटल्सनी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यकच आहे. अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. खासगी डॉक्टर्सनी नोंदणी न केल्यास येत्या १ तारखेपासून एस.एस. सिस्टिमने कचरा उचलणे बंद करणार आहे.

तर दुसरीकडे असे झाल्यास हॉस्पिटलचा कचरा खासगी डॉक्टर्स संबंधित महापालिका आणि नगरपालिकेसमोर ठेवून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा संघटना आणि प्रायव्हेंट हॉस्पिटल्स ओनर्स असोसिएशन दिला आहे. यावरून महापालिका प्रशासनाने आणखी कडक पावले उचलली असून दवाखाने आणि हॉस्पिटल्स यांनी नोंदणी करणे आवश्यकच असल्याचे लोकरे यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स महापालिकेच्या दि. २ एप्रिल २०२४ च्या आदेशानुसार हॉस्पिटलच्या जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट करण्यासाठी नोंदणी शुल्क २ हजार रुपये विनापरतावा महानगरपालिकेकडे शुल्क कसे भरायचे याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात उपायुक्त लोकरे यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. ऑनलाइन नोंदणीसाठी महापालिकेने सोय उपलब्ध केलेली आहे. संबंधित दवाखाने आणि हॉस्पिटल्सनी ँ३३स्र२://ु्रङ्म६ं२३ी. २ङ्म’ंस्र४१ूङ्म१स्रङ्म१ं३्रङ्मल्ल.ङ्म१ॅ येथे ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन लोकरे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR