37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरअंमली पदार्थ विरोधी कायद्याचे खटल्यांसाठी अँड. संतोष न्हावकर यांची नियुक्ती

अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे खटल्यांसाठी अँड. संतोष न्हावकर यांची नियुक्ती

सोलापूर : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नार्कोटिक ड्रग्स कंट्रोल ब्युरो कडून सोलापूर जिल्ह्यात असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे खटल्यांसाठी विशेष सरकारी वकीलपदी अँड. संतोष न्हावकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे.

जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना सरकारतर्फे प्रभावी बाजू मांडून आरोपींच्या शिक्षेचे प्रमाण वाढविल्याने या कामाची दखल घेऊन सरकारने ही नियुक्ती केलेली आहे. ही नियुक्ती चार वर्षांसाठी असून नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट १९८५ व प्रिव्हेंशन ऑफ इलिसीट ट्राफिक इन नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबस्टन्स ऍक्ट १९८८ या दोन्ही कायद्यातून उदभवणाऱ्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील खटल्यांसाठी सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी ही नियुक्ती झालेली आहे.

नविन पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्याने यामध्ये गुंतलेल्या आरोपींवर वचक राहावा असे काम करण्याचा निश्चित प्रयत्न करेन असा विश्वास अँड. संतोष न्हावकर यांनी व्यक्त केला. त्यांचेवर विधी क्षेत्रातील मान्यवर विधीज्ञांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR