38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरबिलाल शेख यांचा राजन पाटील गटात प्रवेश

बिलाल शेख यांचा राजन पाटील गटात प्रवेश

मलिकपेठ : काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष व मोहोळ शहरातील माजी सरपंच हाजी बिलाल भाई शेख यांनी मोहोळ तालुक्यातील काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोहोळ शहरातील काँग्रेसचा मुस्लिम चेहरा असलेले मोहोळ शहरातील माजी सरपंच हाजी बिलाल भाई शेख यांनी प्रवेश केल्याने महायुतीला मोठे पाठबळ मोहोळ शहरातून मिळणार हे निश्चित झाले आहे.

शेख यांनी सांगितले की,मोहोळ तालुका हा माजी आमदार राजन पाटील यांच्या विचारावर चालणारा तालुका आहे.सरपंच होण्याचा मान राजन पाटील यांच्यामुळे मिळाला आहे.राजन पाटील यांच्या आदेश मान्य करत महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार मुस्लिम समाजामध्ये जाऊन करणार असल्याचे सांगितले. यावेळी महिला शहराध्यक्ष यशोदा कांबळे, प्रीती घाडगे,कल्पना खंदारे,तसेच प्रकाश चवरे,बापू डोके,गौतम क्षीरसागर,राजू सुतार, हेमंत गरड, शौकत तडफदार, अझरुद्दीन शेख, आमीन शेख, जुबेर शेख, राजन घाडगे, नसीर शेख, समीर शेख,ताहेर शेख, जक्रीया शेख, हमिद शेख, जैद शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR