34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरथकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद

थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद

सोलापूर : महापालिका प्रशासनाच्या मिळकतकर विभागातील विविध पथकाच्या वतीने गुरुवारी शहर आणि हद्दवाढ भागातील थकीत मिळकतकर वसुलीसाठी शहरातील थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद करून वसुली मोहिम सुरू करण्यात आली. गुरुवारी दिवसभरात महापालिका तिजोरीत एकूण १ कोटी ८२ लाख ४६ हजार ५०९ रुपये कर भरणा झाला आहे.

शहर आणि हद्दवाढ भागातील अद्यापही शेकडो मिळकतदारांकडे अद्यापही कोट्यावधी रुपयांचा कर थकीत आहे. लाखावरील थकीत असलेले शहरातील अनेक मिळकतदार पुढे येत नसल्याने अखेर गुरुवारपासून अशा थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी नाद करून त्यांच्याकडून थकीत कराची वसुली केली जात आहे. शहरातील विविध पेठांमधील थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी नाद करण्यात आला.चालू आर्थिक वर्षातील आणि जुनी थकीत असे एकूण ७४३ कोटींचा कर जमा करण्याचे आव्हान मालमत्ता कर संकलन विभागासमोर आहे. अभय योजना लागू केल्यानंतर सुमारे १०० कोटी रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत.

महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून मार्च महिन्यात १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु २८ मार्चपर्यंत १५ कोटी रुपयांची देखील वसूली झाली नसल्याने महापालिका प्रशासन यापुढे आता कडक कारवाई करणार आहे. थकीत रक्कम भरण्यासाठीमिळकतदार पुढे येत नसल्याने प्रशासनाने कारवाईचा नवा प्रकार सुरू केला आहे. महापालिकेच्या वतीने मिळकत कर थकीत असलेल्यांची नावे शहरातील ५० चौकांमध्ये डिजिटल फलकांवर एकद लाख रुपये किंवा अधिक थकबाकी असणाऱ्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.सध्या थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद करण्यात येत आहे. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांच्या मिळकतींवर बोजा चढवण्याबरोबर कठोर कारवाई करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR