38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवजावयाच्या लढतीकडे लक्ष

जावयाच्या लढतीकडे लक्ष

सतीश टोणगे : कळंब
राज्यात तापमान दिवसेंदिवस वाढ होत असून, त्यात राजकारण तापू लागले आहे. आई वडिलांच्या प्रचारा साठी असल्या कडक उन्हात हि मुले घराबाहेर पडली आहेत. यात अर्चना ताई पाटील यांच्या साठी त्यांची मुले मेघ आणि मल्हार तर सुप्रिया सुळेसाठी रेवती सुळे, बजरंग सोनवणे साठी त्यांची मुलगी डॉ. हर्षदा बाहेर पडल्या आहेत.आई साठी मल्हार एकेरी भाषेत पुढच्या उमेदवारांचा समाचार घेत आहे.

त्या मुळे वातावरणात गरमी आहे. धाराशिव नंतर बीडची लढत रांगदार होत आहे. या कडे राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे उभे आहेत तर त्यांची लढत भाजप च्या पंकजा ताई मुंडे यांच्या सोबत होत आहे.या जिल्ह्यात मराठा समाजाचे मतदान निर्णायक ठरणार आहे. बजरंग सोनवणे यांनी गेली लोकसभा लढवली होती, त्यांनी नवीन असतानाही चांगली लढत दिली होती, त्या वेळी धनंजय मुंडे सोबत होते, या वेळी ते सोबत नाहीत.

बजरंग सोनवणे हे कळंब च्या भवर परिवाराचे जावई आहेत. केज,धारूर परिसरातील बहुतांश गावे कळंब शी निगडित आहेत.कळंब पासून दहा किलोमिटर वर येडेश्वरी साखर कारखाना आहे,त्यामुळे त्यांचे शेतकरी वर्गाला चांगली मदत मिळत आहे.
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीचे ते भक्त असल्याने, तिचा आशीर्वाद घेवून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली..पंकजा ताई ने डोळ्यात पाणी आणून , मता साठी पदर पसरू लागल्या आहेत. शेतकरी पुत्र असलेले बजरंग बली ने बलाढ्य उमेदवार पंकजा ताई ना पळती भुई थोडी केली आहे.एकंदर निकाल वेगळा लागू शकतो अशी कुजबूज होऊ लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR